‘मनपा’च्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यानाचे
पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव

साधारण 1100 चौ.मी.चा संपूर्ण परिसर ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार

जळगाव, ता. 18: जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव व केंद्र शासनाच्या अमृत हरीत क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रायसोनीनगरात उभारण्यात आलेल्या स्व.अटलजी बिहारी वाजपेयी उपवन उद्यान लोकार्पण सोहळा शुक्रवार,दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार पडला. पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

साधारणपणे 1100 चौ.मी. जागेत उभारण्यात आलेल्या या उपवन उद्यानात चिमण्या, कबुतर, कावळे आदी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढावी, यासाठी वृक्षलागवड करण्यात आलेली असून, लॉन, जॉगिंग ट्रॅकचीही या ठिकाणी सुविधा आहे. त्यामुळे हा उद्यान परिसर अतिशय निसर्गरम्य बनला असून, ऑक्सिजननिर्मितीसाठी पोषक ठरणार आहे. प्रभाग क्र. 13 च्या नगरसेविका सौ.ज्योती चव्हाण व प्रभाग अधिकारी श्री.बाळासाहेब चव्हाण यांनी हे उद्यान अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला व परिश्रम घेतले.

माजी मंत्री तथा आमदार श्री.गिरीश महाजन या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.उन्मेष पाटील व महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांची विशेष उपस्थिती होती. तर महापालिका आयुक्त श्री.सतीश कुलकर्णी, आमदार श्री.सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, माजी महापौर श्री.सदाशिवराव ढेकळे, श्री.नितीन लढ्ढा, सौ.सीमा भोळे, महापालिका स्थायी समितीचे सभापती श्री.राजेंद्र घुगे-पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेविका सौ.सुरेखा तायडे, सौ.अंजनाबाई सोनवणे, सौ.गायत्री राणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, सौ.दीपमाला काळे, नगरसेवक श्री.जितेंद्र मराठे, श्री.नितीन बरडे, श्री.विक्रांत ऊर्फ गणेश सोनवणे, श्री.विरेंद्र खडके, महापालिका शहर अभियंता श्री.अरविंद भोसले, शाखा अभियंता श्री.चंद्रकांत सोनगिरे आदींसह रायसोनीनगरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्यानाचे मक्तेदार श्री गजानन एन्टरप्राइजेस, जळगाव हे आहेत.

…………

Daily Khandesh Vishvavedh

Daily Khandesh Vishvavedh (Media is Third Eye’) it is a Marathi language newspaper published in Maharashtra state. Founded in 2018 by Shailesh P. Patil, This News Paper Chief Editor Is Shilesh P. Patil and Chief Excative Editor is Ashoraj S.Tayade it is the fastest Growing regional language newspaper in maharashtra with more than 5 Lakh Readers on all our platform Like Khandesh Vishvavedh Web Portal site ( E-Paper) and Khandesh Vishvavedh News channel on You Tube

https://khandeshvishvavedh.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *